I अनंताच्या पाटीवर लेखक-लेखिका एकत्र येऊन लिहीतात, शब्दांचे 'एकले बीज' पेरणे कष्टाचे काम आहे, त्यातून एखाद्या कवितेचे अंकुर आलेले दिसू शकतात. II अनंतामध्ये अनंत शब्द लिहीले जातील आणि त्यांतून जन्मतील अनेक आठवणी. III लेखक-लेखिका अनंताला शब्दांनी भरतात, त्यांच्यातील भावार्थ विचारशक्तीला आव्हान देतो त्यांतील मथितार्थ वाचकाच्या आस्तित्वाला भारून टाकतो. IV प्रेरणेश्वर त्यांना खेळवतो, भाग्य नेहमीच आडवे येते जेव्हा अनंताच्या पाटीवर लिहीलेले शब्द अनंताचे आस्तित्व पुसून टाकतात, जे शब्द कोणाला आवडले असते, कदाचित. V जर या कलेने वाचकांचे रंजन केले, तर ती सार्थ. जर या कलेने माझे पोट भरले, तर तो माझा स्वार्थ. तरीही, जर शब्द कधीच वाचले गेले नाहीत, कुणाला ते अनंताच्या अडगळीत सापडले, आसमंत दुमदुमले, धरणीच्या कडा फाटल्या आणि शेवटल्या पूर्णविरामात ते विरून गेले. | Entry #34450 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
|